आघारकरांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयास देणगी

By Admin | Published: September 21, 2016 12:18 AM2016-09-21T00:18:43+5:302016-09-21T00:28:30+5:30

आघारकरांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयास देणगी

Donation to mental teachers for the memory of Agharkar | आघारकरांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयास देणगी

आघारकरांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयास देणगी

googlenewsNext

नाशिक : दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक अविनाश आघारकर यांच्या स्मरणार्थ आघारकर कुटुंबीयांच्या वतीने पेठरोडवरील जलाराम निवासी मतिमंद विद्यालयास देणगी देण्यात आली. यावेळी जिजाऊ हास्य क्लबच्या आदिती आघारकर यांनी विद्यालयातील मुलांशी संवाद साधत त्यांच्यासमोर हास्य प्रात्यक्षिके सादर केली.
पेठरोडवर श्री साईबाबा शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मतिमंद विद्यार्थ्यांसाठी विद्यालय चालविले जाते. सटाणा येथील युवक सोनू मोरे हा विद्यालयाची धुरा सांभाळतो आहे. मतिमंद मुलांना आपल्या पायावर उभे करण्याचा संकल्प विद्यालयाने सोडलेला आहे.
लोकाश्रयावर चालणाऱ्या या विद्यालयात प्रशिक्षक अविनाश आघारकर हे विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत असत. त्यामुळे आघारकर कुटुंबीयांच्या वतीने विद्यालयाला त्यांच्या स्मरणार्थ देणगी देण्यात आली. आघारकर यांच्या पत्नी श्रीमती आदिती आघारकर व कन्या शर्वरी यांनी विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि देणगी देत मुलांना खाऊचे वाटप
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Donation to mental teachers for the memory of Agharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.