ओझा परिवाराकडून मेंढीच्या शिवाश्रमाला देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 07:02 PM2019-06-16T19:02:17+5:302019-06-16T19:02:46+5:30
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात समाजातील दिव्यांग घटकांसाठी साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रमासाठी सिन्नर येथील ओझा परिवाराच्या वतीने पाच हजार रूपयांची देणगी देण्यात आली.
रामरतन शिवनारायण ओझा यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनाचे औचित्य साधून शिवाश्रमाचे संकल्पक शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मेंढी येथे डॉ. तनपुरे यांनी शिवाश्रम प्रकल्पाच्या बांधकामास सुरूवात केली आहे. सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते व त्यांच्या परिवाराने या सामाजिक उपक्रमासाठी स्वत:ची जमीन दान दिली असून बांधकामासाठी विविध सामाजिक घटकांकडून सहाय्य मिळत आहे. शिवाश्रमात समाजातील दिव्यांग घटकांसह निराधार व्यक्तींना आधार देण्यात येऊन शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यात येणार आहे. ओझा परिवारातील रामविलास, नंदिकशोर, ओमप्रकाश, सचिन यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त साधेपणाने पूजाविधी करून शिवाश्रमासाठी त्यांच्या स्मरणार्थ पाच हजार रूपये देणगी देवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.