कुस्तींच्या मॅटसाठी सुमारे २५ हजार रु पयांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:15 PM2019-07-01T16:15:21+5:302019-07-01T16:15:51+5:30
लोहोणेर : - येथील जनता विद्यालयातील भावी कुस्तीगीरांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून येथील रहिवासी असलेल्या पोलीस अधिकाº्यांनी कुस्तीच्या खेळासाठी अत्यावश्यक असलेल्या मॅट खरेदीसाठी सुमारे २५ हजार रु पयांची काढलेली वर्गणी लोहोणेर येथील पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते स्कुल कमिटीच्या सदस्य कडे देणगी म्हणून जमा केली.
लोहोणेर : - येथील जनता विद्यालयातील भावी कुस्तीगीरांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून येथील रहिवासी असलेल्या पोलीस अधिकाº्यांनी कुस्तीच्या खेळासाठी अत्यावश्यक असलेल्या मॅट खरेदीसाठी सुमारे २५ हजार रु पयांची काढलेली वर्गणी लोहोणेर येथील पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते स्कुल कमिटीच्या सदस्य कडे देणगी म्हणून जमा केली. आज लोहोणेर गावचे मूळचे रहिवासी असलेले व सध्या बाहेरगावी पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रमोद शेवाळे ( डी. एस.पी.),देविदास सोनवणे, ( पोलीस निरीक्षक), व बापूसाहेब महाजन ( पोलीस निरीक्षक) यांनी सुमारे २५ हजार रु पये देणगी स्कुल कमिटीच्या सदस्य कडे पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते जमा केली. यावेळी जनता विद्यालयातील राज्य पातळीवर व जिल्हा पातळीवर कुस्ती खेळण्यासाठी गेलेल्या कुस्तीगीरासह स्कुल कमिटीचे भेय्या देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी,धोंडू आहिरे, राजाराम सोनवणे, संजय महाजन, शरद परदेशी, सोमनाथ पवार, संजय सोनवणे, दत्ता जाधव, खंडू आहिरे, नंदलाल निकम, नंदलाल जाधव, हिरामण परदेशी, केवळ सोनवणे,यांच्यासह वैभव जाधव, दुर्गेश गुजर, अक्षय गरु ड, जयेश महाजन, दुर्गेश पानसरे आदी उपस्थित होते.