रेशनकार्डवर जीवनावश्यक वस्तू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 03:34 PM2020-10-21T15:34:05+5:302020-10-22T00:28:23+5:30
सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली.

सोबत एक लिटर खाद्य तेलाची बाटली तहसीलदारांना भेट देऊन गांधीगिरी करण्यात आली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहेत. त्यात खाद्य तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रतिलिटर 105 ते 140 रुपये दर झाले असून दर कमी करावे. खाद्यतेल, मैदा, साखर, हरभरा डाळ, रवा आदींसह इतर जीवनाश्यक वस्तू रेशन कार्डवर कमी दरात उपलब्ध करून देऊन गोरगरीबांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोसावी यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.