मामाच्या गावाला दांडी मारून पक्ष्यांसाठी दाणापाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 05:48 PM2019-05-17T17:48:00+5:302019-05-17T17:48:22+5:30
येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना मानोरी बुद्रुक परिसरात तापमानाने चाळीशी पार केल्याने चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सायली वावधाने आणि अजिंक्य वावधाने या दोन शाळकरी मुलांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उन्हाळी सुट्टीत दाणापाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
मानोरी : येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना मानोरी बुद्रुक परिसरात तापमानाने चाळीशी पार केल्याने चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सायली वावधाने आणि अजिंक्य वावधाने या दोन शाळकरी मुलांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उन्हाळी सुट्टीत दाणापाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
परिसरात सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी चिमणी, कावळे, साळुंकी सारखे अनेक पक्षी पाणी पिताना मागिल काही दिवसापूर्वी दिसून येत होते.यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता येथील या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी मामाच्या घरी सुट्टीचा आनंदन लुटता सायली वावधाने ,अजिंक्य वावधाने या दोन विद्यार्थ्यांनी अपल्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला, गुलमोहर, अशा विविध झाडांना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कापून तसेच मातीपासून बनविलेल्या भांड्यांचा उपयोग या पक्षांच्या दानापाण्याची सोयी साठी केला आहे. दानापाण्याची सोय उपलब्ध केल्याने पक्षांची भटकंती काहीशी थांबणार आहे.
मानोरी गावच्या वेशीत तसेच झाडावर, अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्षांचा किलबिलाट काहीसा कमी झाला होता.तसेच उष्णतेचा पारा मागील महिनाभरापासून उष्णतेचा पारा चाळीशी पार गेल्याने याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवू लागला होता. मानोरीच्या या विद्यार्थ्यांनी पक्षांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती पाहून उन्हाळी सुट्टीत मामाच्या घरी आनंद घेता पक्षांना दानापाण्याची सोय करून चिमण्या या झाडांना अडकवलेल्या बाटल्यातुन पाणी पिऊन तहान भागवितात. मातीच्या भांड्यातून दाणे खाऊन आपली भूक भागवितात. हे करताना सुट्टीचा खरा आनंद मिळत असल्याचे या चिमुकल्यांनी सांगितले.