अनकाई ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:46 PM2020-04-10T17:46:12+5:302020-04-10T17:46:32+5:30
तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना सॅनिटायझर, मास्क व रेशन खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना सॅनिटायझर, मास्क व रेशन खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनच्या पार्श्वभूमीवर १४ दिव्यांग लाभार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क व धान्य खरेदीसाठी प्रत्येकी एक हजार रु पयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. प्रतिनिधीक स्वरूपात राहुल बोराडे यांना सरपंच डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते सॅनिटायझर बाटली, मास्क व एक हजार रु पयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बाळू अहिरे, ग्रामसेवक महेश भाबड, विलास अहिरे, शरद देवकर, सचिन बर्डे, माजी सरपंच नामदेव सोनवणे, राजू परदेशी आदी उपस्थित होते.