दातार जेनिटिक्स लॅबचा जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींच्या दाव्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:31+5:302021-03-01T04:17:31+5:30

दातार जेनेटिक्स लॅबमधील अहवालाची शासकीय लॅबमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील ...

Donor Genetics Lab warns District Collector of Rs 500 crore claim | दातार जेनिटिक्स लॅबचा जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींच्या दाव्याचा इशारा

दातार जेनिटिक्स लॅबचा जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींच्या दाव्याचा इशारा

Next

दातार जेनेटिक्स लॅबमधील अहवालाची शासकीय लॅबमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये विसंगती आढळल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दातार लॅबला पुढील आदेशापर्यंत कोरोना स्वॅब टेस्टींग करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईवर आक्षेप घेत दातार लॅबने जिल्हाधिकाऱ्यांवरच अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाारा दिला आहे. टेस्टींग बंद करण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा संधी दिली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यासंदभार्त देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दातार लॅबने म्हटले आहे की, कारवाई करताना शासकीय लॅबमधील पुनर्चाचणी तपशील देण्यात आलेला नाही. ज्या प्रयोगशाळेत पुनर्चाचणी करण्यात आली ती प्रयोगशाळा एनएबीएल किंवा आयसीएमआर प्रमाणित होती का? असा सवालही उपस्थित केला आहे. दातार लॅबकडे आजवर केलेल्या सर्व चाचण्यांचे नमुने उपलब्ध असून जिल्हाधिकाऱ्यांनी हे नमुने एनआयव्ही या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेत पाठवावेत. येथील चाचणीत नमुन्यांमध्ये विसंगती सापडली नाही तर जिल्हाधिकऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केलेली आहे.

दरम्यान, दातार लॅबमधील अहवाल जिल्हा प्रशासनाला अडचणीचे वाटत असल्याने यापुढे कोविडची चाचणी कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दातार जेनेटिक्सने पत्रकात म्हटले आहे. जेनेटिक्सने जिल्हाधिकाऱ्यांवर ५०० कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर कार्यवाही करीत असल्याचे कळविण्यात आले आहे.

Web Title: Donor Genetics Lab warns District Collector of Rs 500 crore claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.