नामांतरावरून सरकार अडचणीत येईल इतकेही भांडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:01+5:302021-01-19T04:18:01+5:30
भुजबळ यांनी सोमवारी (दि.१८) नाशिकमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बेालत होते. सध्या नामांतरावरून सेना आणि ...
भुजबळ यांनी सोमवारी (दि.१८) नाशिकमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बेालत होते. सध्या नामांतरावरून सेना आणि काँग्रेसकडून वादग्रस्त विधाने येत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा सल्ला दिला आहे. वादग्रस्त सीमारेषेवरही भुजबळ यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली. बेळगाव येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार दडपशाही करीत आहे. त्यामुळे हा भाग केंद्रशासित म्हणून घोषित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली, तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार प्रकरणाच्या आरोपानंतर त्यांनी आधी चौकशी तर होऊ द्या, मग पक्ष निर्णय घेईल, असे सांगितले. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात अनेक कंगाेरे समोर येत आहेत म्हणूनच आधी चौकशी होणे क्रमप्राप्त आहे, असेही ते म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारातील सर्वच घटक पक्षांनी स्वबळाची भाषा केली तर महाविकास आघाडी होणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.
इन्फो..
विरोधकांनी ग्रामपंचायत निकालाचा अभ्यास करावा
राज्यात सोमवारी (दि.१८) ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. हा निकाल दिलासादायक आहे. मी विरोधकांवर टीका करणार नाही, परंतु विरोधकांनी या निकालाचा विचार करावा, असेही भुजबळ म्हणाले.