गर्दी होऊ देऊ नका, सामाजिक अंतर पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:58+5:302021-02-27T04:17:58+5:30
इंदिरानगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून तो रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय लॉन्स चालकांना नियमावली घालून दिली आहे ...
इंदिरानगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून तो रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय लॉन्स चालकांना नियमावली घालून दिली आहे त्याचे पालन न केल्यास संबंधित आयोजक व लॉन्स चालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी दिला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी परिसरातील मंगल कार्यालय, लॉन्स व हॉटेल चालकांची बैठक घेतली. या बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी विवाह सोहळ्याला शंभर लोकांची परवानगी असून विवाह सोहळ्यास प्रत्येकानी माक्स लावणे, सॅनिटायझर ची व्यवस्था करणे, सामाजिक अंतर पाळणे, गोरज मुहूर्त विवाह टाळण्याच्या सूचना केली. त्याचप्रमाणे अशाप्रकारच्या कार्यक्रमांना पोलीस आयुक्त कार्यालयातून सात दिवस आधीच परवानगी घ्यावी अशा सूचनाही के्ल्या. परवानगी शिवाय लॉन्स व मंगल कार्यालय उपलब्ध करून देऊ नये, तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये असे म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमानची माहितीही त्यांनी यावेळी व्यावसायिकांना दिली. विवाह सोहळ्याच्या दिवशी शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या अंमलबजावणीविषयी पोलिसांकडून पडताळणी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष केले.
===Photopath===
260221\26nsk_54_26022021_13.jpg
===Caption===
इंदिरानगर पोलीस ठाण्यात लॉन्स , मंगल कार्यालये व हॉटेल व्यावसायिकांसोबत संवाद साधताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर