'१०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका...; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:09 AM2023-05-20T11:09:55+5:302023-05-20T11:12:48+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
NIA'ची मोठी कारवाई! जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये चार ठिकाणी छापे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, त्रंबकेश्वर मधील गावकऱ्यांनी यात निर्णय घ्यायचा आहे. बाहेरच्यांनी यात पडायच कारण नाही. ज्या गोष्टी चुकीच्या घडतील त्यावर प्रहार करणे गरजेचे आहे. गडकिल्ल्यावर दर्गे आहेत ते हटवले पाहिजेत. चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर प्रहार केलाच पाहिजे. पण, जाणून बुजून कोणतेही विषय काढायचे याला काही अर्थ नाही. जिकडे मराठी मुस्लिम राहतात तिथे कधीही दंगली होत नाहीत, तिकडे सामंजस्य आहेत ते बिघडू नयेत, त्र्यंबकेश्वरमधील १०० वर्ष जुनी परंपरा मोडू नकाअसंही राज ठाकरे म्हणाले.
"बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात जर हिंदू खतरेमें आहे असं म्हटल्यावर कस होईल, जस जशा निवडणुका जवळ येतील तस हे सुरू होईल, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा सुरू आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठका होणार आहेत. यावेळी ठाकरे यांनी बासरू प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. 'जमिनीच्या व्यवहारातून या गोष्टी होत आहेत. कमी भावात जमिनी घ्यायच्या.जैतापूर च काय झालं? जैतापूरला का नाही होत प्रकल्प?, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.