खिशात नाही आणा अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:53+5:302021-09-09T04:19:53+5:30
असाच एक किस्सा घडला. पेठ रोड परिसरातील आरटीओ कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराला एका प्रवाशाने हात दिला. चला चाललोच आहे तर ...
असाच एक किस्सा घडला. पेठ रोड परिसरातील आरटीओ कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराला एका प्रवाशाने हात दिला. चला चाललोच आहे तर घेऊ पुढेपर्यंत असा विचार करून दुचाकीस्वाराने गाडी उभी करून संबंधितास मागे बसवले. फुलेनगर चौफुली आल्यावर दुचाकीस्वाराला उजव्या बाजूला वळायचे असल्याने त्याने गाडी वळवली. तसे मागे बसलेले महाशय ओरडले, ‘अहो, मला पेठ फाट्यावर जायचं आहे.’ दुचाकीस्वार विनंती करून म्हणाला की, ‘मी तिकडे जाणार नाही आहे. तुम्ही येथून दुसऱ्या गाडीने जाऊ शकता...’ यावर कपाळाच्या आठ्या चढवत ते महाशय तोऱ्यात म्हणाले, ‘काय राव .. मला आधी सांगायचं ना मी रिक्षा करून गेलो असतो..’ हे ऐकून बिचारा दुचाकीस्वार चांगलाच हिरमुसला झाला.
यालाच म्हणतात खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा !
- एस. आर. शिंदे