न घसरता चला, पाच हजार रुपये जिंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:43+5:302021-09-27T04:14:43+5:30
कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. सध्या हा रस्ता फक्त काळ्या मातीचा आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे तो ...
कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. सध्या हा रस्ता फक्त काळ्या मातीचा आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे तो अत्यंत धोकादायक झाला आहे. पावसामुळे त्यातून वाटचाल करणे अत्यंत अवघड झाले आहे. पंधराशे लोक या रस्त्याचा वापर करतात. ओढा, शिलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी ओढा आणि शिलापूर या दोन्ही ग्रामपंचायतींकडे वेळोवेळी तक्रारी करूनही आश्वासनाखेरीज दुसरे काहीही मिळालेले नाही. गावातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेणेही शक्य होत नाही. किमान मुरूम टाकून तरी हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करावा आणि पावसाळा झाल्यानंतर तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच रमेश कहाडंळ यांनी सांगितले की, आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे रस्तादुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे. आमदारांनी या रस्त्यासाठी २० लाखांचा निधी देण्याचे कबूल केले आहे.