कोरोना लसीकरणात सरमिसळ नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:04+5:302021-08-21T04:19:04+5:30
शासकीय विश्रामगृह येवला येथे शुक्रवारी (दि.२०) येवला, तसेच निफाड तालुक्यातील कोरोनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ...
शासकीय विश्रामगृह येवला येथे शुक्रवारी (दि.२०) येवला, तसेच निफाड तालुक्यातील कोरोनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व कार्यशाळेचे उद्घाटन भुजबळ यांच्या झाले. भुजबळ यांनी सांगितले, ई-पीक पाहणी ॲपमुळे पीकविमा व कृषी विभागातील लाभ, शेतीसाठी पीक कर्ज पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना सुलभरीत्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या ॲपमुळे हमीभावाने शेतमाल विक्री, तसेच सातबारा उतारा काढणे सोपे होणार असून, पिकांच्या नोंदणीची सर्व माहिती शासनाकडे असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केल्यास त्यांची चुकीच्या नोंदणीतुन सुटका होऊन, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
इन्फो
थेट सहभागाची मोहीम
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन म्हणजे १५ ऑगस्ट, २०२१ पासून ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर राबविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनांच्या लाभासाठी त्यात ठिबक सिंचन असो वा तुषार सिंचन योजना, आधारभूत किमतीवर खरेदी, पीककर्ज, पीकविमा योजना यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक-पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविण्यासाठीची व शेतकऱ्यांच्या थेट सहभागाची ही मोहीम आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी स्वत:चे पीक-पेरणी स्वत: नोंदविण्याचे स्वातंत्र्य मिळाले, असेही भुजबळ यांनी सांगितले.
फोटो- २० भुजबळ
येवला येथे ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी व अधिकारी.
200821\20nsk_28_20082021_13.jpg
फोटो- २० भुजबळ येवला येथे ई पीक पाहणी मोबाईल ॲप व कार्यशाळेचे उदघाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी व अधिकारी.