‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’: ठाणे मॅरेथॉन विजेती आरती पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:12 PM2019-08-24T23:12:39+5:302019-08-24T23:17:59+5:30
नाशिक- मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे.
नाशिक- मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी आरती पाटीलचे नाव प्राधान्याने समोर आले आहे. नुकतीच ठााणे मॅरॅथॉन स्पर्धा जिंकणा-या आरती पाटील हिच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : ठाणे मॅरेथॉन तुझ्यासाठी नवीन नाही, यापूर्वीदेखील ही स्पर्धा जिंकलेली आहे. हा विजय तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे.
पाटील : ठाणे मॅरेथॉन यापूर्वी मी २०१७ मध्ये जिंंकलेली आहे. त्यानंतरही अनेक मॅरेथॉनमध्ये नाशिकचे नाव उंचावता आले आहे. यश, अपयश हा खेळाचा एक भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत एका मोठ्या विजयाची गरज होती. नाशिकसाठी आणि अन्य धावपटूंनादेखील बुस्ट मिळण्यासाठी हे गरजेचे होते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या अॅथलेटिक्ससाठी मोठ्या विजयाची गरज होती. या विजयामुळे माझ्यासह सर्वांना ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच या विजयाचे जास्त कौतुक आहे.
प्रश्न : तुझ्या खेळातील सातत्य आणि कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. तुझ्या कामगिरीकडे तू कसे बघते.
पाटील : इयत्ता पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केलेली आहे. आज दहा वर्षे पूर्ण झाली असून, मागे वळून पाहिले तर खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा असल्यामुळे मला अजून थांबायचे नाही. खूप काही करायचे आहे, मिळवायचे आहे. कविता, मोनिका, संजीवनी यांचा आदर्श आणि मार्गदर्शन असल्यामुळे तर आणखीनच उत्साह संचारतो. तरीही खूप मोठा असा विचार केलेला नाही. सध्या एव्हढेच समजते की ‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’, त्यामुळे लागलीच फार मोठे स्वप्न सांगता येणार नाही. परंतु आलेल्या प्रत्येक स्पर्धेचा सराव मात्र कसून करते.
प्रश्न : सराव आणि शिक्षण याचा ताळमेळ तू कसा साधते? दिनचर्या कशी आहे?
पाटील : सरावात सातत्य ठेवावेच लागते, प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांचे गुरूतुल्य मार्गदर्शन असल्यामुळे सरावाचे योग्य सूत्र साधत नियमित रोज सकाळी दोन तास सराव, त्यानंतर डायट, दुपारी कॉलेज, त्यानंतर दुपारी पूर्णपणे आराम आणि सायंकाळी पुन्हा दोन तास सराव. सरावानंतर अभ्यास असा रोजचा दिनक्रम आहे.
मुलाखत : संदीप भालेराव