पक्षाची पदे शोभेपुरती ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:23+5:302020-12-30T04:19:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड विभागातील प्रभाग १७, २० आणि २१ मधील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक गोसावीवाडी, आणि जेल ...
राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड विभागातील प्रभाग १७, २० आणि २१ मधील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक गोसावीवाडी, आणि जेल रोड येथील दुर्गा मंदिर येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष रंजन ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते निवृत्ती आरिंगळे, मनोहर कोरडे, जगदिश पवार, शैलेश ढगे, बाळासाहेब मते, योगेश निसाळ, प्रशांत वाघ, संजय पगारे आदी होते. बैठकीत प्रभागातील समस्या, त्यावर आंदोलन यावर विचारविनिमय करण्यात आला. रस्ता, शौचालय, स्वच्छतागृह, गार्डन, गटारी, अभ्यासिका यांची दुरवस्था, कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा, बंद व्यायाम शाळा अशा नागरिक समस्यांवर चर्चा होऊन सदरचे प्रश्न सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला मिलिंद पगारे, तुषार दोंदे, राजाभाऊ पवार, रमेश ताजनपुरे, वंदना चाळीसगावकर, सुरेखा निमसे, निर्मला गांगुर्डे, प्रमिला चव्हाण, पुष्पलता उदावंत, रूपाली पठारे, गिरीश मुदलीयार, प्रवीण बैसाणे, ताहेर शेख, सागर शिंदे, विशाल घाडगे, राहुल तुपे, चंदू साडे, जमशेद वस्ताद, नियामत शेख, वसीम शेख आदी उपस्थित होते.