बापरे! ...अन्यथा तुमचं कासव प्रेम ठरेल गंभीर गुन्हा; जाणून घ्या, काय आहे कायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:03 PM2022-03-07T13:03:12+5:302022-03-07T13:05:39+5:30

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं ...

Don't keep turtles in the house, it will be a serious crime | बापरे! ...अन्यथा तुमचं कासव प्रेम ठरेल गंभीर गुन्हा; जाणून घ्या, काय आहे कायदा?

बापरे! ...अन्यथा तुमचं कासव प्रेम ठरेल गंभीर गुन्हा; जाणून घ्या, काय आहे कायदा?

googlenewsNext

नाशिक - नाशिक शहर आणि बहुतांश परिसरात नागरिक घरामध्ये अथवा दुकानात विविध प्रजातीचे कासव पाळतात. कासव हा पाळीव प्राणी असल्याचं समजलं जातं. पण कासवांच्या बहुतांश प्रजाती असून काही विदेशी प्रजातींसह अन्य प्रजाती पाळणे वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा देखील ठरतो. यामुळे त्याबाबतची माहिती करून घ्यावी. अन्यथा तुमचं कासव प्रेम हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. 

काय आहे कायदा...?

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा१९७२अंतर्गत अनुसूची १ ते ४ मध्ये समाविष्ट होणारे कुठलेही वन्यजीव कोणत्याही उद्देशाने जवळ बाळगणे गुन्हा ठरतो. त्यानुसार वन किंवा वन्यजीव विभागाकडून कारवाईदेखील केली जाते. कासवांच्या बहुतांश प्रजाती या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्याविषयीची माहिती नसल्यामुळे कासव पाळण्याचा छंद हा अडचणीत आणू शकतो.

कासवांच्या या प्रजाती पाळू नयेत

भारतीय वन्यजीव संस्थानकडून कासवांच्या काही प्रजातींविषयीची माहिती देण्यात आली आहेत. या प्रजाती कोणताही व्यक्ती स्वत:जवळ कायद्याने बाळगू शकत नाही. बहुतांश कासव प्रजाती या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत तसेच चिंताजनक, धोकादायक स्थितीत अशा वर्गवारीत समाविष्ट आहेत.

अनुसूची-१ मधील कासवांच्या प्रजाती

१) भारतीय मृदू कवचाची कासव

२)आसाम रुफ टर्टल

३) कोचिन फॉरेस्ट केन टर्टल

४) इंडियन फ्लॅपशेल टर्टल

५) इंडियन लीफ टर्टल

६) इंडियन पिकॉक सॉफ्टशेल टर्टल

७), इंडियन रुफ टर्टल आदी.

कासवांना वन्यजीव कायद्याचे ‘संरक्षण’

कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कासव कुठल्याही उद्देशने पकडणे, विकणे किंवा विकत घेणे आणि पाळणे बेकायदेशीर ठरते. वाढते जल प्रदूषण आणि कासवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होत चालली आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहीसे झाल्यास त्याचे मोठे गंभीर परिणाम पृथ्वीतलावर बघावयास मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तस्करीचा मोठा धोका

जंगलातील तलावांमध्येसुद्धा कासवांची संख्या घटू लागली आहे. कारण कासवांच्या तस्करीचे प्रमाण हे वाढू लागले आहे. उत्तरप्रदेश राज्य हे कासवांच्या तस्करीचे केंद्र समजले जाते. महाराष्ट्र आणि बंगालमधून सॉफ्टशेल टर्टल, कर्नाटकमधून अंदनी कासव अशा विविध राज्यांतून विविध प्रजातीच्या कासवांची तस्करी उत्तर प्रदेशच्या दिशेने केली जाते.

 

Web Title: Don't keep turtles in the house, it will be a serious crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.