घाबरून जाऊ नका, संगणकाला बरे-वाईट समजत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:15 AM2021-09-13T04:15:04+5:302021-09-13T04:15:04+5:30

कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घरात कोंडल्याचे भीषण दृश्य गेल्या काही दिवसांत अनुभवायला मिळाले. भारतासारख्या विकसनशील देशात तर अपुऱ्या सोयी-सुविधांअभावी ...

Don't panic, the computer doesn't know right from wrong! | घाबरून जाऊ नका, संगणकाला बरे-वाईट समजत नाही!

घाबरून जाऊ नका, संगणकाला बरे-वाईट समजत नाही!

Next

कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घरात कोंडल्याचे भीषण दृश्य गेल्या काही दिवसांत अनुभवायला मिळाले. भारतासारख्या विकसनशील देशात तर अपुऱ्या सोयी-सुविधांअभावी अशा परिस्थितीत दैनंदिन व्यवहार, दळणवळण, शाळा, शिक्षण कसे चालणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला; परंतु संगणकाने यापूर्वीच घडवून आणलेली डिजिटल क्रांती ऑनलाइन तंत्रज्ञानाने याच काळात घराघरात पोहोचवली. त्यामुळेच घरातील आई-बाबा आणि अंगणवाडीतील शिक्षिकांऐवजी पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बोबड्या बोलांचा आधारही त्यांच्या हातात आलेला मोबाइल आणि त्यातून दिसणारे कार्टून बनले असे काहीसे चित्र अवतीभोवती दिसत नसेल तरच नवल. मुलांचा वाढता वयोगट आणखीनच या प्रवाहात सामावल्याचे ओळखून वेगवेगळ्या मोबाइल ॲप कंपन्यांनी ऑनलाइन माध्यमातून काॅर्पोरेट एज्युकेशन प्रणाली विकसित करून छोट्या-मोठ्या शिकवणी चालकांचे शटर डाऊन करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल येणाऱ्या काळात शाळा-महाविद्यालयांच्या दिशेने पडणारच नाही, असे नाही. ते रोखण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती इंटरनेट, मोबाइलच्या साह्याने कुठेही आणि केव्हाही मिळू शकते; परंतु त्यातील सामाजिक व भावनिक बरे- वाईट दृष्टिकोन पडताळण्याचे कसब हे शिक्षकच देऊ शकतात, त्याच दिशेने मार्गक्रमण करीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढे येऊन काम करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

- नामदेव भोर

Web Title: Don't panic, the computer doesn't know right from wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.