येवल्यात लसीकरणासाठी थांबेना गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:55+5:302021-05-11T04:15:55+5:30

येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय येथील लसीकरण केंद्रावर नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.१०) देखील गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्तात यावेळी ...

Don't stop for vaccination in Yeola | येवल्यात लसीकरणासाठी थांबेना गर्दी

येवल्यात लसीकरणासाठी थांबेना गर्दी

Next

येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय येथील लसीकरण केंद्रावर नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.१०) देखील गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्तात यावेळी टोकन वाटप करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटांतील नोंदणीकृत ७८ व्यक्तींना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली, तर ४५ वर्षांपुढील १०० व्यक्तींना कोविशिल्ड लसीचे लसीकरण झाले. उपजिल्हा रुग्णालयाकडे कोव्हॅक्सिनचे १,२५० डोस उपलब्ध असून, कोविशिल्ड लस मात्र उपलब्ध नाही. रुग्णालयाच्या वतीने जिल्हास्तरावर लसीची मागणी करण्यात आली आहे.

येवला लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थी लस घेण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येत आहेत. या लसीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याने व संबंधित पोर्टलवर काही मिनिटांतच नोंदणी फुल्ल झाल्याचे दाखवत असल्याने येवलेकरांचा हिरमोड होत आहे. येवलेकरांसाठी स्थानिक स्तरावर नोंदणी प्रक्रिया राबविण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आले असून, रुग्णालयातील ६७ सेंट्रल ऑटोपॉइंटचा विचार करून, प्रारंभी ६७ बेडची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु ऑक्सिजनचा तुटवडा व नियमित पुरवठा होत नसल्याने बेडसंख्या कमी करून ४३ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात ३३ रुग्ण दाखल आहेत. यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. नगरसूल ग्रामीण रुग्णालयातही डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणीही ऑक्सिजन तुटवड्याचा विचार करून, बेड संख्या कमी करण्यात आली आहे.

इन्फो

आजवर झालेले लसीकरण

लसीकरणाचे ठिकाण घेतलेले सत्र लाभार्थी

अंदरसूल - ३९ ३८२६

मुखेड ३६ ३४६४

पाटोदा ५१ ३८३७

सावरगाव ५४ ४३७८

भारम ३१ २४४३

येवला ३४ ४३९१

एकूण - २४५ २२,३३९

कोट

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात गैरसमज आहेत. याबाबत गावोगावी जाऊन जागृती, प्रबोधन करत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गाव-खेड्यात विशेष लसीकरण सत्र घेतले जात आहेत. मागणीपेक्षा कमी प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. तालुक्याला लोकसंख्येच्या तुलनेत लस मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

- प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती

फोटो - १० येवला लसीकरण

Web Title: Don't stop for vaccination in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.