न कुणी जवळ घेईना, न गावी येऊ देईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:28 PM2020-05-03T21:28:45+5:302020-05-03T21:30:04+5:30

शफीक शेख । लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : सध्या मालेगावकरांची अवस्था मोठी विचित्र अन् वाळीत टाकल्यासारखी झाली आहे. कारण ...

 Don't take anyone near, don't let them come to the village ... | न कुणी जवळ घेईना, न गावी येऊ देईना...

न कुणी जवळ घेईना, न गावी येऊ देईना...

Next
ठळक मुद्देमालेगावकरांची अवस्था वाळीत टाकल्यासारखी

शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : सध्या मालेगावकरांची अवस्था मोठी विचित्र अन् वाळीत टाकल्यासारखी झाली आहे. कारण न सगे न सोबती कुणीही जवळ घेईना आणि कुणाकडे जावे म्हणतो तर कुणी गावी येऊ देईना. शहरात ठिकठिकाणी कन्टोन्मेंट झोन झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू घ्यायला जाणेही अवघड झाले. आता गावभर पोलीस आणि एसआरपी तैनात असल्याने लहान मुलेही दहशतीत आहेत; पण बाहेरगावहून आलेल्या पोलीस आणि एसआरपी जवानांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे कुटुंबीयदेखील चिंंतेत आहेत.
आता धड शहरात कुणाकडे कुणी जाऊ शकत नाही आणि दारावरून जाणाराही कोरोनाबाधित तर नाही ना म्हणून त्याचेकडे बघितले जाते. यामुळे जिवावर उदार होऊन भाजीपाला दारात येऊन भाजी विकणारा तोही साशंक आणि घेणारा त्याहूनही अधिक घाबरलेला अशी अवस्था झालीय. त्यात लॉकडाउनने नातलग दूर केले. नोकरीवर जाणाऱ्या पतीकडे आणि मुलाकडेही शंकेने पाहिले जातेय. बाहेरगावी म्हणजे दूरचे तर सोडा तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाची इतकी दहशत आहे की कामानिमित्त गेलेला माणूस मालेगावचा नाही ना याची खात्री केली जाते. नाशिकसारख्या शहरात तर नागरिकांना आवाहन केले जाते की आपल्या सोसायटीत, कॉलनीत कुणी मालेगाव, जळगाव, मुंबई किंंवा पुण्याहून आला असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या म्हणजे मालेगावकरांची दहशत इतर गावांनी घेतली आहे. मात्र शहरवासीय कसे जगत असतील त्यांच्यात मनात काय चालले असेल, याची कल्पना न केलेली बरी त्यामुळे आजतरी शहराची अवस्था आई जवळ घेईना आणि कुणी जवळ येऊ देईना अशी वाळीत टाकल्यासारखी झाली आहे.

Web Title:  Don't take anyone near, don't let them come to the village ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.