मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:31 PM2019-01-23T16:31:15+5:302019-01-23T16:34:04+5:30

सावरकरनगर येथे राहणारे प्रतिक सुशिल चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भुखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता.

The door came from the back door and emptied the jewels in the bungalow ...! | मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...!

मागच्या दाराने आले अन् बंगल्यातील दागिण्यांची तिजोरी रिकामी करुन गेले...!

Next
ठळक मुद्देआठ लाख दहा हजाराचे दागिणे लंपास केल्याची घटना गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडी

नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, दुचाकीचोरी, हाणामाऱ्यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून गंगापूररोडवरील सावरकरनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील ‘शिल्प’ बंगल्यात किचना दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील सुमारे आठ लाख दहा हजाराचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सावरकरनगर येथे राहणारे प्रतिक सुशिल चक्रनारायण यांच्या ३६ क्रमांकाच्या भुखंडावरील शिल्प बंगला कुलूपबंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंगल्यात पाठीमागील बाजूने किचनचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बंगल्यातील लाकडी कपाट तोडून त्यामधील लहान तिजोरी फोडून दागिने भामट्याने लंपास केल्याचे चक्रनारायण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्याने वीस तोळे सोन्याची सुमारे तीन लाखाची सोन्याची अंगठी, ४५ हजाराच्या सोन्याच्या प्रत्येकी ४०ग्रॅमच्या नऊ बांगड्या, ४० हजाराचे कानातील खडे असलेल्या दोन रिंग, ३० हजाराच्या गळ्यातील सोन्याच पॅँडल, १० हजाराच्या कानातील पाच ग्रॅमच्या रिंग, एक लाखाचे गळ्यातील अ‍ॅमरॉल्ड पॅँडल, ३०हजाराचे गळ्यातील हिरेजडीत पॅँडल, एक लाखाच्या दोन सोन्याच्या बांगड्या,४५ हजाराचे तीन तोळ्याचा हार, ६० हजाराचा चार तोळ्यांच्या बांगड्या, ५०हजाराची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.
याप्रकरणी गंगापूर पालीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरिक्षक वाघ करीत आहेत.

गुन्हेगारांची दहशत; संध्याकाळी घरफोडी
सावरकरनगर, गंगापूररोड परिसर, नृसिंहनगर, आकाशवाणी टॉवर या भागात या जबरी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घर बंद करुन जाणेदेखील धोक्याचे ठरु लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. गंगापूर पोलीस ठाण्याकडून या भागात पोलीस गस्त थंडावली असून मोकाट गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण चोरट्यांची मजल इतकी वाढली आहे की त्यांनी शारदाननगर येथील शिल्प बंगल्यातील तिजोरी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लुटून नेली. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील बंद राहणा-या घरांची सुरक्षितता अधिकच धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.अद्याप एकाही संशयिताला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: The door came from the back door and emptied the jewels in the bungalow ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.