अतिसाराचे ‘डोस’; पोषण आहाराचे ‘रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:56 AM2018-07-13T00:56:05+5:302018-07-13T00:56:28+5:30

नाशिक : जिल्ह्यात अतिसारामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणा अजूनही चाचपडत असून, मूळ आजारापर्यंत यंत्रणा पोहचली नसल्याबाबत अधिकाºयांना ‘डोस’ देण्याबरोबरच शालेय पोषण आहारात शिक्षण विभागच पोखरल्याचे पुरावे सादर करीत सदस्यांनी चांगलेच ‘रेशन’ घेतले.

'DOS' of diarrhea; Nutrition Diet 'Ration' | अतिसाराचे ‘डोस’; पोषण आहाराचे ‘रेशन’

अतिसाराचे ‘डोस’; पोषण आहाराचे ‘रेशन’

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची भंबेरी : स्थायी सभेत अधिकारी निरुत्तर

नाशिक : जिल्ह्यात अतिसारामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणा अजूनही चाचपडत असून, मूळ आजारापर्यंत यंत्रणा पोहचली नसल्याबाबत अधिकाºयांना ‘डोस’ देण्याबरोबरच शालेय पोषण आहारात शिक्षण विभागच पोखरल्याचे पुरावे सादर करीत सदस्यांनी चांगलेच ‘रेशन’ घेतले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सुरगाणा आणि कळवण येथील अतिसाराच्या आजाराबाबत तसेच पोषण आहाराबाबत जिल्हा परिषदेची निष्प्रभ यंत्रणा सदस्यांची चव्हाट्यावर मांडली. जिल्ह्यात अतिसाराचा फैलाव झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात जिल्हा परिषदेची बदनामी झाली असून, ही शरमेची बाब असल्याचे सांगत साथीच्या आजाराबाबत जिल्हा आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ सदस्य भारती पवार, आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर आणि यतिन कदम यांनी सभागृहात उभे राहूनच सभा चालविण्याचा पवित्रा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यातील साथीच्या आजाराचे निर्मूलन करण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आणि त्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचे सांगून पाण्याचे स्रोत बंद करण्यात आल्याचे सांगितले. येथील पाण्याचे स्रोत, क्लोरिनची मात्रा आणि त्यातील घटक तपासले जात असल्याचे सदस्यांना सांगितले. गिते यांनी जिल्हा परिषद सक्षम उपाययोजना करीत असल्याचे सांगून सदस्यांना आसनग्रहण करण्याची विनंती केल्यानंतर सदस्य आसनावर
बसले.
यावेळी आत्माराम कुंभार्डे यांनी आरोग्य विभागातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाºयांना तालुक्याच्या ठिकाणी तत्काळ पाठविण्याची सूचना केली. त्यांच्या प्रतिनियुक्ती रद्दचा ठरावच त्यांनी यावेळी केला. तसेच आरोग्य कर्मचाºयांची संख्या वाढविण्याचीही मागणी नोंदविली. मानसेवी वैद्यकीय पथक नियुक्ती करण्याची सूचनाही कुंभार्डे यांनी केली. भारती पवार यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाºयांना रुग्णांच्या रक्ताचे नमुने आले आहेत का? अशी विचारणा करून नेमके मृत्यू कशामुळे झाले, असे विचारले असता अतिसाराची शक्यता असल्याचे त्यांनी उत्तर दिले. यावर पवार यांनी आजाराचे निदान झालेले नसतानाही केवळ संभाव्यता म्हणून आरोग्य यंत्रणा काम करीत असेल तर प्रत्यक्ष रिपोर्ट येईपर्यंत आजार बळावल्यास कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित केला. ट्रीटमेंट सुरू असताना रुग्णांची संख्या वाढत असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. साथरोगावरील कामकाजाचे निदान न होताच सुरू असलेल्या प्रयत्नांवर डॉ. कुंभार्डे आणि डॉ. भारती पवार यांनी वैद्यकीय अधिकाºयांचा चांगलेच ‘डोस’ पाजले.
शालेय पोषण आहाराबाबतही डॉ. कुंभार्डे यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. शाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी पोषण आहार पोहचत नसल्याची बाब त्यांनी उघड केली. शिक्षण विभागाने संबंधित ठेकेदाराला विचारणा केली का असा सवाल शिक्षणाधिकारी झनकर यांना विचारला. किती पुरवठा झाला, किती तांदूळ वाटप करण्यात आला. पुरवठा न झाल्यास संबंधित ठेकेदाराच्या दंडाची टक्केवारी झनकर यांना विचारली असता त्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. झनकर आणि पोषण आहार विभागाचे घुगे यांनी सभागृहाला दिलेली माहिती चुकीची असल्याचे कुंभार्डे यांनी सप्रमाण सादर करून शिक्षण विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोषण आहार न पुरवितानाही ठेकेदारास बिल अदा करू नये, असा ठराव त्यांनी यावेळी मांडला.
स्वतंत्र कक्ष स्थापन करणार
जिल्ह्यातील साथरोग आटोक्यात आणण्यासाठी तालुक्यात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी यावेळी केली. या कक्षामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती केली जाईल, तसेच या कक्षाचा स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकदेखील असणार आहे. स्वतंत्र रुग्णवाहिका तैनात करण्यात येईल, असे यावेळी सांगळे यांनी जाहीर केले. तशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.

Web Title: 'DOS' of diarrhea; Nutrition Diet 'Ration'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.