पालखी यात्रेतील बालकांना पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 06:05 PM2021-01-31T18:05:27+5:302021-01-31T18:06:27+5:30

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत यावर्षी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून पालखी मार्गक्रमणाचा रविवारी तिसरा दिवस होता. सिन्नर - शिर्डी महामार्गालगत असलेल्या वावी येथील परिसरात पालखीत सहभागी झालेल्या महिलांच्या ५ वर्षाआतील बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.

Dosage of polio to children on palanquin journey | पालखी यात्रेतील बालकांना पोलिओचा डोस

पालखी यात्रेतील बालकांना पोलिओचा डोस

Next
ठळक मुद्देआत्महत्याग्रस्तांच्या वारसांना शिलाई मशीन भेट

नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत यावर्षी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून पालखी मार्गक्रमणाचा रविवारी तिसरा दिवस होता. सिन्नर - शिर्डी महामार्गालगत असलेल्या वावी येथील परिसरात पालखीत सहभागी झालेल्या महिलांच्या ५ वर्षाआतील बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.

आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना शिलाई मशीन भेट

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जवळील तोरंगण, दलपतपूर येथील आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे. तोरंगण येथील दिलीप बोरसे, दलपतपूर येथील सुरेश धनगर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या वारसांना त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी व पंचायत समितीच्या कार्यक्रमांर्गत तसेच जैन ग्रुप यांच्या विद्यमाने आत्महत्याग्रस्ताचे वारस मंजुळाबाई धनगर, पोलीस पाटील लता बोरसे यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली आहे.
मटाणे येथील आरोग्य उपकेंद्रात पोलिओ लसीकरण
मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील आरोग्य उपकेंद्रात पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न झाली. यावेळी मोहीमेचा शुभारंभ आरोग्य अधिकारी डॉ. तिलोतमा देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्यसेविका एन. ओ. भामरे, आशासेविका वंदना पवार, अंगणवाडी सेविका कमल आहेर आदी उपकेंद्र कर्मचारी यांनी लहान बालकांना लस दिली. याकामी गावातील बहुउददेशीय युवामंच च्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन बालकांना लसीकरण स्थळी लसीकरणाठी आपल्या वाहनातून आणण्याची व्यवस्था केली.

Web Title: Dosage of polio to children on palanquin journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.