कोरोना रोखण्यासाठी महापालिकेला गमेंचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:32+5:302021-04-04T04:15:32+5:30
शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असून, मध्यंतरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीतदेखील शासकीय यंत्रणांना कानपिचक्या दिल्या ...
शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असून, मध्यंतरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीतदेखील शासकीय यंत्रणांना कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर शनिवारी (दि.३) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि आयुक्त कैलास जाधव यांनी शहरातील गोविंद नगर, तसेच पाथर्डी फाटा येथील प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराच्या भेटी दरम्यान त्यांनी या सूचना केल्या.
गेल्या वर्षी कोरोनाचे महासंकट उद्भवले तेव्हा गमे यांनी महापालिकेत अनेक वेगवेगळ्या उपाययेाजना केल्या होत्या. कोरोनाबाधित आढळल्यावर त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये महाकवच ॲप डाऊनलोड केले जात असे आणि बाधिताच्या संपर्कात कोणती व्यक्ती किती वेळ आहे याची माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेतला जात आणि तेथेही ट्रेसिंग केले जात असे. त्याचप्रमाणे गृहविलगीकरणातील बाधिताच्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्के मारले गेल्यानंतर ते कोठेही गेले तरी ॲपमुळे सहज शोधले जात होते. तसेच गृहविलगीकरणातील रुग्ण घरीच आहेत की बाहेर गेलेत हेदेखील नियमितपणे तपासले जात होते. तेच करण्याची सूचनादेखील गमे यांनी शनिवारी (दि. ३) दिली.
शासन आणि मुख्यालयातून येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना यावेळी महापालिका आयुक्त जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपआयुक्त अर्चना तांबे, विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित हेाते.
इन्फो...
बाधितांकडील कचऱ्याची विल्हेवाट
कोरोना बाधिताच्या घरातील कचरा हा बायोमेडिकल असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेल्या वर्षी विशेष येाजना राबविण्यात आली होती, त्याच धर्तीवर आताही बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
इन्फो...
आशा वर्कर्सची भूमिका महत्त्वाची
आशा वर्कर्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे झाले पाहिजे यासाठी बाधिताच्या कामाच्या ठिकाणी, तसेच अन्यत्र किती नागरिकांशी त्याचा संपर्क आला, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.
===Photopath===
030421\03nsk_37_03042021_13.jpg
===Caption===
शहरातील गोविंद नगर येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी करताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे समवेत सुरज मांढरे व कैलास जाधव आदी