जिल्ह्यात बाधितांची ‘डबल सेंचुरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:24 PM2020-04-29T23:24:34+5:302020-04-29T23:26:22+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी जिल्ह्यात बाधितांनी व्दिशतकाचा आकडा पार केला. नवे ११ बाधित आढळून आले असून, त्यात मालेगावच्या १० तर येवल्यातील एकाचा समावेश आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेेंदिवस घट्ट होत आहे. बुधवारी जिल्ह्यात बाधितांनी व्दिशतकाचा आकडा पार केला. नवे ११ बाधित आढळून आले असून, त्यात मालेगावच्या १० तर येवल्यातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०५वर गेली आहे. मालेगाव येथे १० तर येवला येथे १ रुग्ण आढळून आला. बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशकात भेट देऊन छगन भुजबळ व दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
---------
येवल्यात १३० जणांना होम क्वॉरंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी जे ८४ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले त्यातील ४३ संशयितांची तपासणी नाशकातील लॅबमध्ये करण्यात आली. २४ तासात नाशकातील अहवाल प्राप्त झाले. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आरोग्य सेवेतील रिक्त जागा त्वरित भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, उमेदवारांचे अर्जही मागविण्यात आले आहेत.