मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट
By admin | Published: May 13, 2015 01:08 AM2015-05-13T01:08:05+5:302015-05-13T01:08:50+5:30
मुंबई उपनगरला दुहेरी मुकुट
नाशिक : नाशिक जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनद्वारा आयोजित मिनी सॉफ्टबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली. मुंबई उपनगरच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी स्पर्धेचे विजेतेपद संपादन करीत दुहेरी मुकुट पटकावला. नवी मुंबईच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी उपविजेतेपद पटकावत पुन्हा एकदा मुंबईचे वर्चस्व सिद्ध केले. जळगाव जिल्'ाच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघांनी तृतीय स्थान पटकावीत उत्तर महाराष्ट्राची लाज राखली. तिसऱ्या दिवशी झालेल्या मुलांच्या पहिल्या उपान्त्य सामन्यामध्ये नवी मुुंबई संघाने जळगावचा ५-४ होम रनने, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने यजमान नाशिक संघाचा ८-५ होमरनच्या फरकाने पराभव करीत अंतिम सामन्यामध्ये धडक दिली. अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई उपनगरने बाजी मारली व पहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यामध्ये यजमान नाशिक संघाला जळगाव संघाकडून पराभव पत्करावा लागला. मुलींचा अंतिम सामनासुद्धा मुंबई उपनगर विरुद्ध नवी मुंबई असा झाला. त्या सामन्यातसुद्धा मुंबई उपनगर संघाने नवी मुंबई संघाचा पराभव करीत आपल्या संघाला दुहेरी मुकुट प्राप्त करून दिला. बक्षीस वितरण सभारंभास प्रमुख अतिथी म्हणून म. रा. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य व नाट्य दिग्दर्शक सुरेश गायधनी उपस्थित होते. डॉ. प्रदीप तळवेलकर, ऋतुराज कुर्तडकर, नितीन पाटील, तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे अध्यक्षस्थानी होते. पंच म्हणून नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील चांदेकर, पीयूष चांदेकर (यवतमाळ), विश्वास गायकर आदिंनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिव हेमंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू शिंदे, अन्वर खान, मयूर जाधव, रणजित शर्मा, सुरासे, प्रवीण राठोड, हर्षद वसईकर, रुपेश जगताप, सायली सराफ, अर्पिता देशपांडे आदिंनी प्रयत्न केले.