होमगाडर््सना स्थगिती दिल्याने पोलिसांना डबल ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:45 PM2020-01-17T22:45:06+5:302020-01-18T01:11:53+5:30

शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दोन-दोन महिने कायमस्वरूपी नेमण्यात आलेल्या होमगाडर््सना स्थगिती देण्यात आली असून, संख्याबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा भार आला आहे.

Double duty to police for deferring homeguards | होमगाडर््सना स्थगिती दिल्याने पोलिसांना डबल ड्युटी

होमगाडर््सना स्थगिती दिल्याने पोलिसांना डबल ड्युटी

Next
ठळक मुद्देरोजगारावर कुºहाड : शासनाकडे निधी नसल्याने घेतला निर्णय

गणेश शेवरे ।
पिंपळगाव बसवंत : शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दोन-दोन महिने कायमस्वरूपी नेमण्यात आलेल्या होमगाडर््सना स्थगिती देण्यात आली असून, संख्याबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा भार आला आहे.
पोलीस ठाण्याची हद्द मोठी व कर्मचारी संख्याबळ कमी तसेच बाहेरगावी तपास, सप्ताहिक रजा या सर्व बाबींचा विचार करता पोलीस निरीक्षकाला कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी देण्यासाठी विचार करावा लागत होता. पण शासनाने संख्याबळ कमी असलेल्या ठिकाणी होमगार्ड नेमून पोलिसांना आधार दिला होता. मात्र, आता होमगाडर््सना स्थगिती देण्यात तो प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचे चित्र शासनाकडून रेखाटले गेले आहे. शासनाकडून व्यवसायिक व विशेष सेवा या लेखा शीर्षकाखाली निधी उपलब्ध झालेला नसल्याचे कारण सांगत समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार २६ डिसेंबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२० या कालावधीकरिता देण्यात आलेल्या कायमस्वरूपी होमगार्ड बंदोबस्त करणाºयांना घरी बसण्याची वेळ आली आहे. शासनाने राज्यभर पोलीस होमगार्डची कायमस्वरूपी दोन-दोन महिने नेमणूक केली होती. त्याला महिना पण पूर्ण होत नाही तोच निधी उपलब्ध नसल्याचे सांगत कायमस्वरूपी नेमणुकीवर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेचे ताण वाढण्याची शक्यता असून, अनेक पोलीस कर्मचाºयांवर डबल ड्युटीचा भार येणार असल्याचे मत पोलीस क्षेत्रतील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव परिसरासह गर्दीच्या शहरात पोलिसांना सहकार्य करणाºया होमगार्डच्या रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे. कायदा व सुरक्षा पोलिसांच्याच बरोबरीने सांभाळणाच्या होमगाडर््सना स्थगिती दिल्याने अपुरे संख्याबळ असलेल्या पोलीस ठाण्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुन्हा वाढणार गुन्हेगारी
पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलीस संख्याबळ कमी असल्याने होमगार्ड नेमण्यात आल्याने तपासाला बाहेरगावी व रजेवर असलेल्या पोलिसांची कमतरता भासत नव्हती. पण होमगार्ड्ना देण्यासाठी मानधन शिल्लक नसल्याने त्यांना नेमण्यात आलेल्या कालावधीच्या अगोदरच स्थगिती देण्यात आली. यामुळे अपुºया संख्याबळ असलेल्या पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीला ऊत येणार आहे. तसेच पोलिसांवर कामाचा ताणही वाढणार आहे.

बसस्थानक होणार टवाळखोरांचा अड्डा
विनाकारण कुठलेही काम नसताना धूमस्टाइलने बसस्थानकात गाडी चालवणाºया रोमिओंना तसेच महाविद्यालयीन तरु णींची छेड काढणाºया टवाळखोरांना चाप बसावा म्हणून पिंपळगाव पोलिसांकडून परिसरात होमगाडर््स नेमण्यात आले होते. त्यामुळे चोरी, छेडछाड आदी प्रकरांना आळा बसला होता. मात्र नव्या आदेशानुसार होमगाडर््सना कायमस्वरूपी स्थगिती दिल्यामुळे बसस्थानक परिसरात पुन्हा गुंडगिरी निर्माण होण्याची भीती प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांवर याचा भार येणार असून, गुन्हेगारांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.

दोन महिने कायमस्वरूपी नेमणूक केल्याने जे होमगार्ड खासगी जॉब संभाळून ड्युटी करत होते त्यांनी जॉब सोडू दिला होता. शासनाने निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत नेमणुकीस स्थगिती दिल्याने अनेक युवकांच्या रोजगारावर कुºहाड पडली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- आर.डी. ढगे,
होमगाडर््स प्रमुख, पिंपळगाव बसवंत

Web Title: Double duty to police for deferring homeguards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस