नोटाबंदीचा दुहेरी फटका

By admin | Published: January 3, 2017 10:54 PM2017-01-03T22:54:20+5:302017-01-03T22:54:46+5:30

द्याने परिसरातील शेतकरी हवालदिल

Double-flick knockout | नोटाबंदीचा दुहेरी फटका

नोटाबंदीचा दुहेरी फटका

Next

द्याने : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे द्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, ५० दिवसांनंतरही व्यापाऱ्यांकडे चलन तुटवडा असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.  शेतकऱ्यांनी मका व कांदा विक्र ी केल्यानंतर तब्बल १५ दिवसात धनादेश मिळत असून, धनादेश जमा होण्यास अजून १५ दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे. मजुरांना मजुरी देण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे पूर्वी चालत असलेली ‘पडजी’ पद्धतीने व्यवहार सुरू असल्याचे चित्र मोसम परिसरात पाहावयास मिळत आहे. नामपूर आठवडे बाजारात भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली असून भाजीपाला तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.  केंद्रसरकारने 8 नोव्हेंबरपासून एक हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या.हा निर्णय चांगला असला तरी 50 दिवस उलटूनही सरकार नवीन चलन उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरल्याने व्यवहारात चलनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतीचे अनेक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.बाजारात शेतीमाल विक्र ीनंतर तब्बल एक मिहना पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कांदा गहू,हरभरा ही पिके जोमात आहेत त्यांच्याकरिता खतांची मात्रा,बियाणे खरेदी करण्याची लगबग सुरु आहे.शेतीची कामे वाढल्यामुळे शेतमजुरांची गरज भेडसावत आहे.मात्र आवश्यक पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे.
बँकांमध्ये शेतकरी, पेन्शनर, महिला, अपंग, वृद्ध यांना रांगेत उभे राहून मिळताय कमी पैसे मिळत असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरीवर्गाची मोठ्या प्रमाणावर खाती असून, पुरेसा चलन पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर थांबावे लागते.
नोटबंदीमुळे बँकातून रक्कम काढण्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना पैसे काढण्यासाठी वारंवार बँकेत जावे लागत असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिवसभर उभे राहून दोनच हजार हातात मिळत असून, त्यामुळे पैसे काढण्यासाठी वारंवार जावे लागत असल्याने शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना बँकेत रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांना मालविक्र ीनंतर पैसे रोख मिळत नसल्यामुळे सध्या कांदा, मका, हरभरा, गहू आदि पिकांना खते, बियाणे, औषधे, मजुरांचे पैसे देणे असो की दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पैसा बँकांकडून मिळत नसल्याने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असून, द्यानेसह मोसम परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. शेतीची मशागत, खते, लागवडीसाठी मजुरांना देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कांदा मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने व विकलेल्या मालाचे धनादेश मिळत असल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)

Web Title: Double-flick knockout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.