करंजगावचा दुहेरी सन्मान

By admin | Published: July 19, 2016 12:53 AM2016-07-19T00:53:33+5:302016-07-19T01:08:12+5:30

करंजगावचा दुहेरी सन्मान

Double honor of Karanjgaon | करंजगावचा दुहेरी सन्मान

करंजगावचा दुहेरी सन्मान

Next

निफाड : तालुक्यातील करंजगाव ग्रामपालिकेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिकच्या कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा लोकसहभाग व सामाजिक एकतेचा तीन लाख रुपयांचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार व जिल्हास्तरीय ओडीएफ (हगणदारीमुक्त गाव) विशेष पुरस्कार हा दुहेरी पुरस्कार पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील व ग्रामपालिका पदाधिकारी यांनी स्वीकारला. तीन लाख रु पयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप
होते.
यावेळी व्यासपीठावर जि. प अध्यक्ष विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, राहुल अहेर, सुनील बागुल, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, सीईओ मिलिंद शंभरकर, अनिल लांडगे, सभापती केदा अहेर व मान्यवर उपस्थित होते. करंजगावचे सरपंच खंडू बोडके-पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांच्यासह माजी सरपंच सुरेशबापू राजोळे, सागर जाधव, उपसरपंच सुनील कडाळे, वसंत जाधव, नंदू राजोळे, सोनाली राजेंद्र राजोळे,
प्रवीण पाटील राजोळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Double honor of Karanjgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.