लसणाची दुप्पट आवक : बाजारभाव मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:44 AM2018-12-11T00:44:31+5:302018-12-11T00:44:53+5:30
पंचवटी : भाजीची चव वाढविणाऱ्या याच लसूण मालाची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा ...
पंचवटी : भाजीची चव वाढविणाऱ्या याच लसूण मालाची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यंदा बाजार समितीत इंदोर येथून मोठ्या प्रमाणात लसणाची आवक होत असल्याने लसणाचे किलोचे बाजारभाव चक्क पाच रुपयांवर आले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांत लसूण मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने लसुणाचे दर कोसळत चालले आहे. नाशिक बाजार समितीत दैनंदिन कमीत कमी दोन चारचाकी वाहने भरून लसूण मालाची आवक होते. इंदोरमध्ये लसूण मालाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते व हाच लसूण माल बाजार समितीत आणला जातो. यंदा लसणाची आवक वाढलेली असल्याने लसणाला प्रति किलोसाठी चक्क पाच रुपये असा निचांकी बाजारभाव मिळत आहे, तर सरासरी १० ते ११ रुपये किलो अशा बाजारभावाने लसणाची विक्री होत आहे. मध्य प्रदेशातील लसूण स्वस्त असल्याने व त्यातच उत्पन्न जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात नाशिकच्या बाजारात येतो याउलट आवक कमी व बाजारभाव तेजित असले तर गुजरात, राजस्थान राज्यातून आवक होते.
गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी कमीतकमी ६० रुपये प्रति किलो दराने विक्री होणाºया मालाला आवक वाढल्याने ५ ते १० रुपयांपर्यंत असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याचे नाशिक बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
नाशिक बाजार समितीत इंदोर येथून मोठ्या प्रमाणात लसूण मालाची आवक होते. गेल्या काही वर्षांपासून लसूण मालाची प्रचंड आवक वाढली आहे त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवला आहे. लसूण प्रति ५ रुपये किलो दराने विक्री होतो तर सरासरी १० ते ११ रुपये बाजारभाव मिळतो. मध्य प्रदेशात लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. - एस. के. वनवे, लसूण व्यापारी,