सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:21 PM2020-06-21T22:21:50+5:302020-06-22T00:02:08+5:30
नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणीला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र सोयाबीनच्या उगवण- क्षमतेबाबत अनेक शेतकरी साशंक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन अगदीच पातळ उतरले असून, अन्य ठिकाणी बियाणे उतरलेच नसल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन उतारा कमी होण्याची तज्ज्ञांकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
जिल्ह्यात यावर्षी चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांची खरिपाची लगबग सुरू आहे. मागील वर्षी लष्करी अळीमुळे बेजार झालेल्या शेतकºयांनी यावर्षी मक्याऐवजी सोयाबीनला पसंती दिली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.वाहतुकीत हादरे बसले तरी नुकसान शक्यजिल्ह्याच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला वाफसा होण्यासाठी किमान ६० ते ७० मिलीमीटर पाऊस पडणे आवश्यक आहे. अनेक पेरणीची घाई करून थोड्या वापशावर पेरणी केली. त्यामुळे सोयाबीन उगवण क्षमतेवर परिणाम झाला. सोयाबीनचे बियाणे नाजूक असते त्याला वाहतुकीत थोडेफार हादरे बसले तरी त्याच्या उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. अनेक शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करतात. बियाणे अधिक खोल गेले तरी बी जमिनीतच सडते, असे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे उपसंचालक कैलास शिरसाट यांनी सांगितले. काही शेतकºयांच्या पेरण्या पूर्ण होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. ज्या शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली त्यातील काही शेतकºयांनी बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही शेतकºयांचे बियाणे एकदमच पातळ उतरले आहे. यामुळे या शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे.अनेक शेतकरी जमिनीत ओलावा नसताना पेरणी करतात. त्याचा उगवणक्षमतेवर परिणाम होत असतो. सोयाबीनमध्ये हायब्रीड बियाणे नाही. घरचे बियाणे आणि कंपनीच्या बियाणांमध्ये फरक असतो. घरच्या बियाणाची उगवणक्षमता कमी असल्यास मात्रा वाढविणे गरजेचे असते.
- प्रा. तुषार उगले,
के. के. वाघ कृषी महाविद्यालयसोयाबीन बियाणाचे जर्मेनेशन परसेंटेज कमी असल्यामुळे ते कमी असल्यामुळे ते उगवत नाही. अनेक शेतकºयांनी यावर्षी घरचे बियाणे वापरले आहे. त्याची त्यांनी उगवणक्षमता तपासणे आवश्यक होते. काहींनी ती न तपासताच पेरणी केली. जिल्ह्यात सुरुवातीला पहिलाच मोठा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकºयांनी पेरणीस सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या दोन पावसामुळे बियाणे दाबले गेले. त्याचाही उगवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी सोयाबीन काढण्याच्या वेळीच पाऊस आला होता. त्यामुळे अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. ज्यांनी घरचे बी वापरले असेल त्याचाही परिणाम उगवण क्षमतेवर झाला आहे.
- प्रकाश कदम, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सोयाबीन उताºयाची यावर्षी समस्या निर्माण होणारच आहे. कारण मागीलवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बियाणाची उगवण क्षमता खूपच कमी आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे २०० ते ३०० टन बियाणे पडून आहे. कारण त्याची उगवण क्षमताच खूप कमी आहे. त्यामुळे ते शेतकºयांनी दिलेच नाही. यावर्षी शेतकºयांनी शक्यतो घरचेच बियाणे वापरायला हवे. त्याचीही उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असल्यामुळे सोयाबीनला पोषक वातावरण आहे.
- सुरेश दोडके, गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र, निफाड