महापालिकेकडून दुपटीने पाणी
By admin | Published: December 14, 2015 11:58 PM2015-12-14T23:58:27+5:302015-12-15T00:09:32+5:30
कपात३० टक्के वाढ : पाणीपुरवठा वितरणाचे फेरनियोजन
Next
नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी आरक्षणासंबंधी आलेला आदेश लक्षात घेऊन महापालिकेने पाणीकपातीत १५ वरून ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सोमवार, दि. १४ डिसेंबरपासूनच सुरू करण्यात आली आहे. दुपटीने पाणीकपातीचा निर्णय झाल्याने पाणीपुरवठा वितरणाचे फेरनियोजन करण्यात आले असून, त्यामुळे नाशिककरांना एकवेळ पाणीपुरवठा होताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
गंगापूर धरणातील कमी झालेला पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून १५ टक्के पाणीकपात लागू करत शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली होती.