वाजे विद्यालयाचे हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 06:13 PM2018-10-05T18:13:59+5:302018-10-05T18:18:17+5:30
सिन्नर येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे. चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आहे. तसेच १९ वर्षाच्या आतील मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅण्डबॉल स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे.
चाळीसगाव येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील हॅण्डबॉल स्पर्धेत वाजे विद्यालयातील मुलांचा संघ विभागीय स्तरावर उपविजेता ठरला आहे. संघात निखिल कापडणीस, यश गोजरे, किरण कापसे, प्रथमेश गोजरे, प्रद्युम्न काकड, धनंजय कापडणीस, यश चव्हाणके या खेळाडूंचा समावेश होता. तसेच १९ वर्षाच्या आतील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला व विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या संघात स्नेहल वाकचौरे, आरती धनराज, कृतिका आभाळे, सुप्रिया सानप, ऋतिका आव्हाड यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी केली. विभागीय पातळीवर उपविजेता ठरलेल्या संघाचे संस्थेचे संचालक हेमंत वाजे, शालेय समिती अध्यक्ष कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ, उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, पर्यवेक्षक एस. एस. भामरे, एस. जी. पठाण, भाऊसाहेब रणशेवरे यांनी कौतुक केले. विजयी संघास शाळेतील क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर नवले, एच. पी. वाघ, वसंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.