गावठी दारु विक्र ेत्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:13 PM2018-09-13T18:13:08+5:302018-09-13T18:13:18+5:30
कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले.
कळवण : पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले.
या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नवीबेज, भेंडी, बिजोरे, विसापूर, गांगवण, बगडू, चाचेर, भादवण परिसरात गावठी दारु पुरवठा करणारा पिळकोस व गणोरे आदीवासी परिसरात गावठी दारु पुरवठा करणारा गणोरे( कुत्तरबारी) येथील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून धडक मोहीमेत पिळकोस येथे १८00 लिटर तर गणोरे येथे ६00 लिटर असे २४00 लिटर रसायन व १0 लिटर दारु नष्ट करण्यात आली आहे. गावठी दारु पुरवठा करणारे व बनविणारे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरु करु न पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने अवैध दारु विक्र ी व गावठी दारु विक्र ेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पिळकोस शिवारातील गिरणा नदी किनारी परिसरात काटेरी बाभुळांच्या घनदाट झुडपात गावठी दारु तयार केली जात असल्याची माहीती कळवण पोलीसांना मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी काटेरी बांभुळाचा परिसर कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर ,पोलीस हवालदार मधुकर तारु ,किरण परदेशी,विश्वनाथ झरिवाळ, संदीप कडाळे, गोकुळ खैरनार, संदीप बागुल, कैलास घरटे, जगन पवार, दौलत कोशारे यांनी गावठी दारु भट्टीचा शोध घेऊन घनदाट झुडपातील १८00 लीटर रसायन व हातभट्टीचे साहीत्य नेस्तनाबूत केले. २५ ते ३० हजार किमतीचे रसायन व साहीत्य उध्वस्त करु न गावठी दारूचे काटेरी झुडपातील समुळ नष्ट केल्याने अनेक दिवसांपासून चोरी चुपके सुरु असलेल्या गावठी विक्र ीचे अड्डे उध्वस्त झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान पोलीसांचा सुगावा लागताच उत्तम छबू बोरसे, विश्वास दादाजी माळी, कौतिक नारायण सोनवणे (सर्व पिळकोस) हे पळून गेले