सूर्यवंशीकडून डझनभर बेरोजगारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:14 AM2018-12-27T01:14:27+5:302018-12-27T01:14:49+5:30
बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे.
पंचवटी : बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे. मनपाचा निलंबित कर्मचारी सचिन सूर्यवंशी याने या बेरोजगारांना सुमारे ४३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे़ यामध्ये नाशिक, मुंबई तसेच मालेगावच्या बेरोजगार युवकांचा समावेश असून, न्यायालयाने सूर्यवंशीला शुक्रवार (दि़२८)पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़
महापालिकेच्या आस्थापना विभागात नोकरीस असलेला निलंबित कर्मचारी सचिन सूर्यवंशी याने पेठरोडवर राहणाऱ्या प्रमिला बागुल या महिलेसह तिच्या बहीण व भावाला मनपात शिपाई, लिपिक तसेच इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीस लावून देण्याचा बहाणा करून आठ लाख रुपयांची फसवणूक केली़
अन्य मनपा कर्मचाºयांचा सहभाग?
सूर्यवंशी यास पोलिसांनी नियुक्तिपत्राचे टायपिंग करण्यास सांगितले असता ते करता न आल्याने त्याने अन्य सहकाºयांच्या मदतीने बनावट नियुक्तिपत्र बनविण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ या फसवणूक प्रकरणात नाशिक महापालिकेच्या आणखी काही कर्मचाºयांचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.