डॉ. आंबेडकरांचा इगतपुरीत लवकरच पूर्णाकृती पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 11:33 PM2022-03-12T23:33:35+5:302022-03-12T23:35:03+5:30

इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबेडकरांचा भव्य उभा पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या गर्गे स्टुडिओ येथे तयार करण्यासाठी दिला असून समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान व सदस्यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा ७५ टक्के रकमेचा धनादेश गर्गे बंधू यांना देण्यात आला. याप्रसंगी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

Dr. A full-sized statue of Ambedkar will soon be erected at Igatpuri | डॉ. आंबेडकरांचा इगतपुरीत लवकरच पूर्णाकृती पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासाठी रकमेचा धनादेश मूर्तिकार गर्गे बंधू यांना देताना नईम खान, सुनील रोकडे, भास्कर बर्वे, सुरेश भडांगे, दि. ना. उघाडे, राजेंद्र नेटावटे, जितू दोंदे, असलम शेख.

googlenewsNext
ठळक मुद्देनईम खान, समिती सदस्यांनी केली पुतळ्याची पाहणी

इगतपुरी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा पुतळा पूर्णाकृती पुतळा होण्याबाबत नगर परिषदेत ठराव करून पुतळ्याबाबत सर्व शासकीय पूर्तता व परवानगी घेत समितीने डॉ. आंबेडकरांचा भव्य उभा पूर्णाकृती पुतळा नाशिकच्या गर्गे स्टुडिओ येथे तयार करण्यासाठी दिला असून समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान व सदस्यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा ७५ टक्के रकमेचा धनादेश गर्गे बंधू यांना देण्यात आला. याप्रसंगी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मृती जोपासून शहरासह तालुक्याला प्रेरणादायी क्षणाचे स्मरण व्हावे व नव्या पिढीला आदर्श घडावा या उद्देशाने पूर्णाकृती पुतळ्याचे आदर्श कार्य जनतेला एक सामाजिक व एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत नईम खान यांनी सांगितले.

इगतपुरीतील ती ऐतिहासिक सभा
१६ जानेवारी १९३७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक सभा इगतपुरी शहरात झाली होती. त्या सभेचे अध्यक्ष स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. आजही शहरात त्या ऐतिहासिक ठिकाणी अनेक सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम आंबेडकरांच्या स्मृती कायम ठेवून जोपासली जात आहेत. या स्मृती कायम राहण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाला स्फूर्ती व प्रेरणादायी ठराव्यात या उद्देशाने सर्व नागरिकांच्या साक्षीने पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेतल्याचे नगरसेवक सुनील रोकडे यांनी सांगितले.
यावेळी सदस्य भास्कर बर्वे, सुरेश भडांगे, आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे, राजेंद्र नेटावटे, जितू दोंदे, असलम शेख आदी उपस्थित होते.
 
Web Title: Dr. A full-sized statue of Ambedkar will soon be erected at Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.