डॉ. आंबेडकर पुतळ्यास पालकमंत्र्यांचे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:09 AM2020-12-07T04:09:36+5:302020-12-07T04:09:36+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालिमार येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्र्यांनी अभिवादन ...

Dr. Guardian Minister greets Ambedkar statue | डॉ. आंबेडकर पुतळ्यास पालकमंत्र्यांचे अभिवादन

डॉ. आंबेडकर पुतळ्यास पालकमंत्र्यांचे अभिवादन

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शालिमार येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेविका सुषमा पगारे, कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषेदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, संतोष सोनपसारे, अनिता भामरे, अंबादास खैरे, नगरसेवक जगदीश पवार उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, जगातील अनेक विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांच्या नावाची दालने आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारताचे संविधान अनेक देशांना घटना लिहिण्यास मार्गदर्शक आहे. आजही अनेक देश भारताच्या संविधनाचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

(फोटो;आर: भुजबळ अभिवादन)

0000000000

Web Title: Dr. Guardian Minister greets Ambedkar statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.