पाथर्डी फाटा येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:19+5:302020-12-03T04:27:19+5:30

पाथर्डी फाटा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जमिनीपासून ३० फूट उंची असलेला पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. यासाठी ...

Dr. Pathardi will be erected at Fata. Full size statue of Babasaheb Ambedkar | पाथर्डी फाटा येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा

पाथर्डी फाटा येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा

Next

पाथर्डी फाटा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जमिनीपासून ३० फूट उंची असलेला पूर्णाकृती पुतळा उभारला जात आहे. यासाठी चौथरा व बांधकाम पूर्ण झाले आहे. पुतळ्याच्या परवानगीसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय बाबी पूर्ण झाल्या असून, लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी मिळणार आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच नाशिककरांना हा पुतळा बघायला मिळणार आहे.

---------------

चौकट...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नाशिकचे प्रसिद्ध मूर्तिकार विजय बुऱ्हाडे यांनी तयार केला आहे. कांस्य धातूपासून ११ फूट उंचीचा पुतळा बनविण्यात आला आहे. वजन तब्बल दीड टन आहे. तसेच भारतीय संसदेत असलेल्या पुतळ्याप्रमाणे हा पुतळा आहे. पुलावरून व रस्त्यावरूनही पुतळा अतिशय सुंदर व भव्य दिसेल अशी रचना करण्यात आली आहे.

कोट..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. त्यांची शरीररचना अतिशय वेगळी असामान्य होती. या मूर्तीच्या निर्मितीचा अनुभव अतिशय सुंदर आहे. ज्ञानाच्या अथांग महासागराचा पुतळा तयार करण्याचे भाग्य लाभले.

- विजय बुऱ्हाडे, शिल्पकार

Web Title: Dr. Pathardi will be erected at Fata. Full size statue of Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.