डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवले विद्यार्थ्यांचे जाबजबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:10+5:302021-08-29T04:17:10+5:30

पंचवटी : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागातील पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या डॉ. ...

Dr. Police report student's death in Swapnil Shinde's death | डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवले विद्यार्थ्यांचे जाबजबाब

डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोंदवले विद्यार्थ्यांचे जाबजबाब

Next

पंचवटी : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ज्ञ विभागातील पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या डॉ. स्वप्नील शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. २७) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवले आहेत.

महाविद्यालयात डॉ. स्वप्नील शिंदे यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करताना त्यांच्या छातीच्या पिंजऱ्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या असल्याचे समोर आले होते. परंतु, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असले तरी त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने डॉ. शिंदे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास करताना आडगाव पोलिसांनी शिंदे यांच्या मृत्यूनंतर महाविद्यालयातील प्राध्यापक, नर्स तसेच अन्य सहकाऱ्यांचा जाबजबाब नोंदवून घेतला असून आतापर्यंत पोलिसांनी जवळपास दहा ते पंधरा जणांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. याच शृंखलेत पोलिसांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांचेही जबाब नोंदवले आहे. दरम्यान, डॉ. स्वप्नील शिंदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार केली असून महाविद्यालयातील काही महिला डॉक्टर सहकारी छळ करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर पोलिसांनी डॉ. शिंदे यांच्या सहकारी नर्स तसेच काही डॉक्टरांचे जाबजबाब नोंदवून घेतले होते.

Web Title: Dr. Police report student's death in Swapnil Shinde's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.