शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये डॉ. पवार जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:12+5:302021-04-05T04:13:12+5:30

नाशिक : म.वि.प्र. समाज संचलित राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये डॉ. वसंतराव पवार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. वसंतराव ...

Dr. Shahu Maharaj in Tantraniketan. Pawar Jayanti celebration | शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये डॉ. पवार जयंती साजरी

शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये डॉ. पवार जयंती साजरी

Next

नाशिक : म.वि.प्र. समाज संचलित राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमध्ये डॉ. वसंतराव पवार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

डॉ. वसंतराव पवार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शिक्षण, सहकार, समाजकारण, साहित्य संस्कृती क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. मविप्रच्या विस्तारीकरणाबरोबर गुणवत्ता वाढीकडे त्यांनी लक्ष दिले. पारंपारिक शिक्षणाच्या कक्षा रुंदावत त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच प्रेरणा दिनानिमित्ताने डॉ. पवार साहेबांचा आदर्श घेवून प्रत्येक कर्मचाऱ्याने दैनंदिन कामकाज व्यतिरिक्त संस्थेच्या व विद्यार्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे सर यांनी मविप्र संचालित राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन मध्ये डॉ. पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

डॉ. पवार यांनी समाजकारण, राजकारण, व शैक्षणिक क्षेत्रात वेगळी उंची प्राप्त केली. त्यांना नावीन्याचा कायम ध्यास असायचा, त्यांनी आयुष्यभर याबाबत तडजोड केली नाही. शिक्षण क्षेत्रात त्यांनी शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब केला, असे यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. बी. एस. देशमुख या प्रसंगी म्हणाले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. तंत्रनिकेतन मध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी म.वि.प्र. संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार, संस्थेचे सभापती व स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आणि शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील यांनी डॉ. पवार यांना अभिवादन केले.

Web Title: Dr. Shahu Maharaj in Tantraniketan. Pawar Jayanti celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.