स्पुक्टो स्थानिक शाखा अध्यक्षपदी डॉ. पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:17 PM2021-03-07T17:17:13+5:302021-03-07T17:18:16+5:30
कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे स्पुक्टो स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर ...
कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे स्पुक्टो स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर सचिवपदी प्रा. आर. बी. आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन २०२१/२२ या दोन वर्षासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील स्पुक्टो स्थानिक शाखेची विविध पदांसाठी निवड घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर सचिवपदी प्रा.आर. बी. आहेर तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रा. एस. एम. पगार, स्पुक्टो प्रतिनिधी डॉ. एन. बी. कोठावदे, उपाध्यक्ष प्रा. पी. व्ही. नंदनवरे, खजिनदार प्रा. श्रीमती इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थानिक स्पुक्टोचे माजी अध्यक्ष प्रा. एस. एम. पगार यांनी मागील दोन वर्षाचा केलेल्या कामाचा आढावा व स्पुक्टोची भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ. एस. जे. पवार, प्रा. डॉ. एम. डी. वाघ, प्रा. पी. व्ही. नंदनवरे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रा. इंगळे यांनी आभार मानले. (०७ एस जे पवार, ०७ आर बी अहेर)