डॉ. तायडे, करंजीकर, अथणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:12+5:302021-05-06T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येथील प्रख्यात गायक प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रसिद्ध नृत्यांगना सुमुखी अथणी आणि अभिनेत्री विद्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील प्रख्यात गायक प्रा. डॉ. अविराज तायडे, प्रसिद्ध नृत्यांगना सुमुखी अथणी आणि अभिनेत्री विद्या करंजीकर यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) म्हणजेच सेन्सॉर बोर्डांच्या सदस्यपदी निवड झाली आहे. तीन विभिन्न क्षेत्रातील दिग्गजांच्या निवडीमुळे नाशिकच्या कलाकारांची केंद्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचा आनंद आहे.
सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालय सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भाकर यांनी संबंधित सदस्यांना पत्र पाठवले आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली असून मुंबई क्षेत्रासाठी ही निवड असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सीबीएफसी ही एक सरकार मान्यताप्राप्त संस्था असून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत या संस्थेचे काम चालते. ही संस्था देशातील चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे काम करते. तयार केलेल्या चित्रपटाचे पडसाद समाजमनावर उमटत असतात, त्यामुळे तो जसाचा तसा प्रदर्शित करता येत नाही. त्यात काय दाखवावे, काय नाही यावर देखरेख ठेवावी लागते, हे कार्य सेन्सॉर बोर्ड करत असते. भारतातील कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी लागते. अतिशय कडक नियमांमुळे भारतीय सेन्सॉर बोर्ड हे शक्तिशाली सेन्सॉर बोर्डपैकी एक अशी ओळख असल्याने या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.