डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन्सिल चित्रातून जीवनपट
By admin | Published: April 15, 2015 12:50 AM2015-04-15T00:50:07+5:302015-04-15T00:50:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन्सिल चित्रातून जीवनपट
नाशिक : येथील रेखाटन ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन्सिल चित्रातून जीवनपट रेखाटण्यात येणार आहे. या चित्राची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या अनोख्या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला असून, पुढील दहा महिन्यांत हा विश्वविक्रम साकारला जाणार असल्याचे रेखाटन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर नागपुरे यांनी सांगितले. गोळे कॉलनी येथील मंदार को-आॅप. हाऊसिंग सोसायटीमध्ये या उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले. ७ फूट उंच व ९०० फूट लांब असे या चित्राकृतीचे क्षेत्रफळ असेल. याकरिता दहा महिन्यांचा कालावधी, कॅनव्हास रोल्स, पेन्सिल आदि साहित्य लागणार आहे. प्रशिक्षित व निवडक विद्यार्थ्यांकडून हा विश्वविक्रम साकारला जाणार आहे.
यामध्ये मृणाल अहिरे, शारदा लवंगे, खुशाल गोसावी, विनय गोबले, प्राची पोद्दार, दिलीप खोडके, चैताली सदावर्ते, निखिल थोरात, अंकिता जाधव, ऐश्वर्या दिमोटे, जान्हवी बिरारी, सिद्धार्थ कोटे, विद्या पाटील, साक्षी वैद्य, अभिषेक मोरे, गौरी जाधव, प्रज्ञा आवारे, मोनाली समर्थ, पूजा कोठावदे, हेमंत भालेराव आदि विद्यार्थी सहभागी आहेत. (प्रतिनिधी)