बागलाणमध्ये फुलू लागली ड्रॅगन फ्रूट शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:39+5:302021-07-01T04:11:39+5:30
बागलाणच्या शेतकऱ्याला प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. वारकरी ...
बागलाणच्या शेतकऱ्याला प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. वारकरी संप्रदायातील फळशेतीचा छंद असलेले जुने निरपूर येथील एकनाथ चव्हाण यांना काही वर्षांपूर्वी ‘ड्रॅगन फ्रूट’ फळ पिकाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी पडीक पाच एकरमध्ये पाच वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चार वर्षांपासून ते उत्पन्न घेत आहेत. कमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर साधारणपणे २० वर्षांपर्यंत फळे देतात. प्रत्येक हंगामात एक झाड शंभरपेक्षा जास्त फळांचे उत्पादन देत असल्याने प्रति एकर २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लागवडीसाठी सुरुवातीलाच पावणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मशागतीवर फारसा खर्चही करावा लागत नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रूट हे फळपीक ‘वरदान’ ठरले आहे.(३० सटाणा २/३)