नाशकात ड्रेनेजचे चेंबर्स फोडून सांडपाण्यावरही डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:39 PM2018-03-16T18:39:31+5:302018-03-16T18:39:31+5:30

पालिकेकडून कारवाई : मोटारी जप्त, गुन्हे दाखल करणार

Drainage also drained the drainage chambers in Nashik | नाशकात ड्रेनेजचे चेंबर्स फोडून सांडपाण्यावरही डल्ला

नाशकात ड्रेनेजचे चेंबर्स फोडून सांडपाण्यावरही डल्ला

Next
ठळक मुद्देड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकारभुयारी गटार विभागाच्या कर्मचा-यांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत

नाशिक - महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाईनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे, आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या भुयारी गटार विभागामार्फत नंदिनी तथा नासर्डी, गोदावरी नदी काठजवळील ड्रेनेजलाइनमधून जाणारे सांडपाणी बंद करण्याची मोहीम हाती घेतली असून काही ठिकाणी औद्योगिक कंपन्यांकडून नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची मोहीम सुरू असतानाच अनेक ठिकाणी चेंबर्स फोडलेले निदर्शनास आले आहेत. सदर चेंबर्स फोडून त्यात मोठ-मोठे दगड, वाळूने भरलेल्या गोण्या, गोधड्या टाकून पाईपलाइनमधील सांडपाणी अडवले जाते. सदर सांडपाण्याला जवळच वाट करुन देत पाण्याचे तळे तयार केले जाते. सदर साचलेल्या पाण्यात पाईप टाकून मोटारीने पाणी खेचत ते जवळच्या शेतीला दिले जाते. शेतक-यांबरोबरच काही वाळूमाफीयांकडूनही सांडपाणी वळवून त्याचा वापर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेंबर्स फोडून सांडपाण्याची तळी साचत असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हसरूळ शिवारात अशाच प्रकारे चेंबर्स फोडून मोटारीने सांडपाणी शेतात पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने सदर मोटार जप्त केली असून शेतकºयाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत भुयारी गटार विभागाच्या कर्मचा-यांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात, कर्मचा-यांना दगडांबरोबरच फ्लेक्स, गोधड्या आढळून येत आहे. त्यामुळे, महापालिकेने सदर ठिकाणी गस्तीपथक कार्यरत ठेवण्याचा विचार चालविला आहे.

Web Title: Drainage also drained the drainage chambers in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.