कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:41 PM2019-11-14T18:41:10+5:302019-11-14T18:43:01+5:30

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Drainage Empire on the Kanadashi Mainroad | कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य

कनाशी मेनरोडवर सांडपाणीचे साम्राज्य.

Next
ठळक मुद्देकळवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नाराजी

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कनाशी मेनरोडवर कित्येक महिन्यापासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे, रस्त्यावर गटारगंगा झालेली आहे. सदर मोरीचे सिमेंट पाईप चोकअप झाले असल्याने रस्त्यावर सांडपाणीचे साम्राज्य तयार होत आहे. पावसाळ्यात तर नागरिकांना मोठया प्रमाणात या समस्येला तोंड देण्याची वेळ आली होती.
नागरिकांच्या घरामधून पावसाळयाचे पाणी वाहत होते. ग्रामपंचायतने संबंधित विभागाला सूचना देऊन सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलेही कार्यवाही केली गेली नाही. सदर रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सांडपाण्यामधून ये-जा करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे तेथे खड्डे तयार होऊन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
पिंपळा रस्त्यावरील मोरी पुर्णपणे चोकअप झाल्यामुळे कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील सांडपाणी जवळच्याच गटारीत उतरविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही.
मुख्य रस्त्यावरील मोरी बंद झाली असल्याने रस्त्यावरून ये जा करतांना दुर्गंधी पसरत असून सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथक्षच्या रोगांना सामोरे जावण्याची वेळ येवू लागली आहे. त्यामुळे सदर मोरीे दुरूस्तीचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी एकनाथ महाले, विलास बोरसे, प्रकाश महाले, प्रंशात गोविंद, योगेश महाले, नारायण बोरसे, अशोक बोरसे, संजय बागुल, काशिनाथ बोरसे, विश्वनाथ बोरसे, दादा पाटील, विवेक पाटील, राजेद जाधव, भास्कर पगार, संतोष बिरारी आदी नागरिकाकडून होत आहे.
कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रामभरोसे कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- नितीन बोरसे
उपसरपंच, कनाशी.

Web Title: Drainage Empire on the Kanadashi Mainroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.