ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:40 AM2018-03-17T00:40:42+5:302018-03-17T00:40:42+5:30

महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे.

Drainage line chambers break through sewage piracy | ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी

ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी

Next

नाशिक : महापालिकेने टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरील चेंबर्स फोडून सांडपाण्याचीही चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, भुयारी गटार विभागाच्या पथकाने म्हसरूळ शिवारात एका शेतकऱ्याकडून मोटार जप्त करण्याची कारवाई केली आहे. ड्रेनेजलाइनवरील चेंबर्समध्ये दगड, वाळूच्या गोण्या, गोधड्या टाकून सांडपाणी अडवण्याचाही प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  महापालिकेच्या भुयारी गटार विभागामार्फत नंदिनी तथा नासर्डी, गोदावरी नदीकाठाजवळील ड्रेनेजलाइनमधून जाणारे सांडपाणी बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, काही ठिकाणी औद्योगिक कंपन्यांकडून नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची मोहीम सुरू असतानाच अनेक ठिकाणी चेंबर्स फोडलेले निदर्शनास आले आहेत. सदर चेंबर्स फोडून त्यात मोठ-मोठे दगड, वाळूने भरलेल्या गोण्या, गोधड्या टाकून पाइपलाइनमधील सांडपाणी अडवले जाते. सदर सांडपाण्याला जवळच वाट करून देत पाण्याचे तळे तयार केले जाते.  सदर साचलेल्या पाण्यात पाइप टाकून मोटारीने पाणी खेचत ते जवळच्या शेतीला दिले जाते. शेतक- ºयांबरोबरच काही वाळूमाफियांकडूनही सांडपाणी वळवून त्याचा वापर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेंबर्स फोडून सांडपाण्याची तळी साचत असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हसरूळ शिवारात अशाच प्रकारे चेंबर्स फोडून मोटारीने सांडपाणी शेतात पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने सदर मोटार जप्त केली असून, शेतकºयाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सद्यस्थितीत भुयारी गटार विभागाच्या कर्मचाºयांमार्फत फुटलेल्या चेंबर्सची साफसफाई करण्याबरोबरच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात, कर्मचाºयांना दगडांबरोबरच फ्लेक्स, गोधड्या आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेने सदर ठिकाणी गस्तीपथक कार्यरत ठेवण्याचा विचार चालविला आहे.
आणखी काही कंपन्यांना नोटिसा
नासर्डी नदीपात्रात सातपूर औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार, महापालिकेने संबंधित कारखानदारांवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसी व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले होते. सातपूर पाठोपाठ अंबड औद्योगिक वसाहतीतीलही काही कंपन्यांकडून नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत महापालिकेने गंभीरतेने घेतले असून, संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, विधानसभेतही याप्रश्नी स्थानिक आमदारांनी आवाज उठविलेला आहे.

Web Title: Drainage line chambers break through sewage piracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.