गत वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात बाल मृत्यूत कमालीची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:15+5:302021-07-01T04:12:15+5:30

गेल्या वर्षी जानेवारी ते मे या काळात १५१ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यातही जन्मत:च मृत्यू झालेल्या बालकांची संख्या २७ ...

Dramatic decline in child mortality in the district as compared to last year | गत वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात बाल मृत्यूत कमालीची घट

गत वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात बाल मृत्यूत कमालीची घट

Next

गेल्या वर्षी जानेवारी ते मे या काळात १५१ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यातही जन्मत:च मृत्यू झालेल्या बालकांची संख्या २७ तर जन्मल्यानंतर विविध आजारांनी मृत्यू पावलेल्यांची संख्या १२४ इतकी होती. यंदा मात्र हीच संख्या अवघी ६५ इतकी असून, त्यात जन्मत:च मृत्यू झालेल्यांची संख्या १९ तर विविध आजाराने त्रस्त असलेल्या बालकांची संख्या ४६ इतकी असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

चौकट===

आदिवासी तालुके हॉटस्पॉट

बाल मृत्यूत आदिवासी तालुके आघाडीवर असून, त्यातही सुरगाणा, पेठ, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मात्र हे बालमृत्यू जन्मत:च झालेले नसून, जन्मल्यानंतर कुपोषण व तत्सम आजारामुळे मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. समाधानकारक बाब म्हणजे बाळंतपणातच बाल मृत्यू होण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे.

Web Title: Dramatic decline in child mortality in the district as compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.