लाल कांद्याचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:29 PM2020-09-20T23:29:02+5:302020-09-21T00:52:55+5:30
जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे
जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद्याचे स्वप्न भंगले असुन रांगडा कांद्याची रोपे खराब झाल्याने रांगडा कांद्याच्या लागवडी होतात की नाही अशी शंका निर्माण झाली आहे ,शेतकरी थोड्या फार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड करण्याच्या बेतात शेतकरी असतांना मुसळधार पावसाने शेतच तयार होत नसल्याने उरलीसुरली रोपेही जमिनीत सडत असुन ब-याच प्रमाणात कांदा रोपांची सड ,कुज होत आहे, लावलेले कांदा रोप पिळ मारत असुन करपाही मोठया प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दहा ते बारा दिवसापासून रोज रोज भाग बदलून मुसळधार पाऊस येत असल्याने कांदा रोपे व लावलेले कांदे पिवळी पडुन आपोआप नष्ट होत असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीतुन पुरक खते व महागड्या बुरशीनाशकांच्या फवारण्या करु नही फरक पडत नसल्याने येवला तालुक्यातील शेतकर्यांचे लाल कांद्याचे स्वप्न भंगण्याचे शक्यता निर्माण झाली आहे.अनेक शेतकर्यांनी पोळ कांद्यासाठी जमिन राखीव ठेवलेल्या आहेत पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडुन गेल्याने शेतकरी जमिन पडीक ठेवण्यापेक्षा इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे सडुन गेल्याने व लागवड केलेले कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खरिपातील मका, सोयाबीनचा आधार
अगोदर शेतकर्यांच्या कांदा लागवडी नष्ट होत चालल्याने शेतकर्यांना खिरपातील मका सोयाबीन हे पिके आधार देणारे ठरणार असून शेतकर्यांची अशा मका, सोयाबीन पिकाकडे वळाली आहे. जमिनीतून कांदाच आपोआप नष्ट झाल्याने अनेक शेतकरी कांदा रोपे नसल्याने इतर पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच अनेक शेतकरी दुसर्या जिल्ह्यातून कांदा रोपांची शोधाशोध करत असून महागडी रोपे ही खरेदी करत आहे.
कोट
2020 हे वर्ष शेतकर्यांसाठी फारच कठीण जात आहे.लॉकडाऊन मुळे आधीच शेतकर्यांचे कंबरडे मोडले असताना आस्मानी संकटाने शेतकरी धास्तावला आहे. अतिशय महागडे कांदा बियाणे टाकून 80 टक्के रोप वाफ्यातच सडले आहे. लावलेले कांदे पण अति पावसाने खराब झाले आहे. सध्या शेतकर्यांची आशा मका आण िसोयाबीन पिकांवरच अवलंबून आहे. परंतु सध्या असलेले पावसाळी वातावरण बघता तेही हातात येईल की नाही शंका आहे.
- किशोर शिंदे,जळगाव नेऊर