परिवहन समितीचा स्वप्नभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:35 AM2018-07-09T00:35:22+5:302018-07-09T00:37:12+5:30
नाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन समितीची तरतूदच नसल्याचे वृत्त आहे.
संजय पाठक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन समितीची तरतूदच नसल्याचे वृत्त आहे.
नाशिक महापालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त राजवटीपासून परिवहन सेवा हा विषय गाजत आहे. ही सेवा घेण्याचा त्यावेळी आलेला प्रस्ताव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. त्यामागे परिवहन समितीत जाण्यावरून तत्कालीन कॉँग्रेसमधील इच्छुकांची साठमारी हेच कारण होते. त्यामुळे हा विषय मागे पडला असला तरी काही नगरसेवकांना अधूनमधून परिवहन सेवा आणि समितीचे स्वप्न पडत असते. त्यानुसार आत्तापर्यंत चार ते पाच वेळा हा प्रस्ताव महासभेवर आणला गेला; परंंतु अनेक परिवहन समिती चालविणे हे मुळातच महापालिकेवर बंधनकारक नसून ऐच्छिक कामात तरतूद आहे. शिवाय ही सेवा तोट्यातच चालेल आणि त्याही पलीकडे म्हणजे त्यातून महापालिकेची अन्य विकासकामे ठप्प होणार असल्याचे अन्य अनेक मुद्दे मांडून ही सेवा नाकारण्यात आली आहे. आता पुन्हा राज्य शासनच ही योजना महापालिकेच्या गळ्यात मारण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
काही भागात आयटी विभाग कार्यरत
महापालिकेने पहिल्या पंचवार्षिकमध्ये बससेवा सुरू करण्याची तयारी केली होती. त्यासाठी राजीव गांधी भवनाच्या तिसºया मजल्यावर परिवहन समिती सभापतीचे दालन, सभागृह इतकेच नव्हे तर प्रशासकीय कार्यालयात कंडक्टरने पैसे भरावे यासाठी कॅबीनदेखील तयार करण्यात आली होती. मात्र, बससेवा रद्द झाल्याने हे परिश्रम वाया गेले. पुढे (कै.) आशा भोगे महिला बाल कल्याण समितीच्या सभापती झाल्यानंतर त्यांनी हे कार्यालय महिला व बालकल्याण समितीसाठी वापरण्यास सुरुवात केली. आता यातील काही भागात महापालिकेचा आयटी विभागदेखील कार्यरत आहे.