राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:42 PM2019-09-19T18:42:32+5:302019-09-19T18:42:48+5:30

पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dressing up on the National Highway | राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी

राष्ट्रीय महामार्गावर अखेर मलमपट्टी

Next
ठळक मुद्देप्रवाशांमध्ये समाधान : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल

नाशिक ते पेठ रस्त्यावर खड्ड्यांची डागडुजी करताना मजूर.
पेठ : पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने पावसात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत; मात्र संबंधित ठेकेदाराने डांबरी रस्त्यावर मोठमोठे दगड व मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असला तरी या मलमपट्टीमुळे असून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे.

Web Title: Dressing up on the National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.